घर सोडलं रे, पण नेहाच्या संपर्कात होतो मी. तिच्या कडूनंच कळलं तो नराधम मेल्याचं...
त्यानंतर धाकटी आई आणि नेहा दोघींनाही माझ्याकडे बोलवून घेतलं....
गेल्या वर्षी धाकटी आई पण आम्हाला सोडून गेली..
हो, बरोबर ओळखलंस....एड्सनेच !
अरे हो, सद्ध्या मी कलकत्त्यात नाही, पुण्यात आहे.
बरोबर ओळखलंस. मी तरी कसा सुटेन रे यातून...!
शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत आता.
आता तुला कळलंच असेल ... , "ते" म्हणजे कोण ते?
अरे दुसरं कोण, यमदूत....? तसे डॉक्टर्स खूप प्रयत्न करताहेत माझी त्यांच्याशी असलेली दोस्ती तोडण्याचे. पण नाही जमणार त्यांना.
आयुष्यात फक्त दोघांशीच मनापासून दोस्ती केली मी, पण एवढी घट्ट केली की कोणीही तोडू शकणार नाही. एक 'तू' आणि दुसरे 'ते'.....!
आता तू म्हणशील, एवढं सगळं होईपर्यंत का बोलला नाहीस....?
कसा ही असला तरी माझा बाप होता रे तो, खूप प्रेम होतं माझं त्याच्यावर. मीच काय आम्ही सगळ्यांनीच जिवापाड प्रेम केलं त्याच्यावर. त्याचाच गैरफायदा घेतला रे त्याने.
इतक्या वर्षानंतर पत्र लिहिण्याचं प्रयोजन एवढंच की.....
तू खूप केलं आहेस आजवर माझ्यासाठी, हे शेवटचं.....
माझे दिवस संपलेत आता, पण नेहा अजून आहे रे....तिची काळजी घेशील ? तिलाही........! खूप स्वार्थी झालोय रे मी.
पण तुझ्याशिवाय कोणाकडेच पदर पसरू नाही शकत मी.
तुझा..कदाचित कुणाचाच होऊ न शकलेला...
चेतन.
ता. क. : इतके दिवस थांबली होती रेश्मा, गेल्या महिन्यात तिने आत्महत्या केली. आता माझी पाळी.
ती वाट पाहतेय रे, तुझ्या भरवशावर नेहाला सोडून जातोय.
कदाचित अजूनही तुझाच ....
दुर्दैवी, स्वार्थी चेतन.
दुर्दैवी, स्वार्थी चेतन.
लेखक : विशाल कुलकर्णी
भ्रमणध्वनी : ९९६७६६४९१९
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
---|
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.
३ टिप्पण्या:
विशाल, जब्बरदस्त झाली आहे कथा !! खूप आवडली !! एक विचित्र उदासी आल्यासारखी वाटली शेवटचं पान वाचताना :(
वपुंची एक 'असुर' म्हणून कथा आहे तिचाही फॉर्म काहीसा असाच आहे. पत्रातून घटना उलगडत जातात वगैरे.. त्या कथेची आठवण आली. सुंदर !!
विशाल, कथा अस्वस्थ करणारी, पण तुझी शैली खूपच सुरेख आहे लिखाणाची. शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा. पत्रांतून उलगडणारी कथनशैली आवडली.
विशालदा..खूपच सुन्न झालो वाचून. पण हा पत्र संवाद खूप आवडला, ती बोलायची पद्धत, त्यातून मनाला लागणार्या भावना, आणि शेवट.. :(
टिप्पणी पोस्ट करा