थंडीसाठी खास पदार्थ!

सध्या छान थंडीचे दिवस आहेत.या हिवाळी ऋतूमध्ये शरीराला अधिक उर्जा व उष्णता हवी असते. त्यासाठी हे खास पदार्थ. खसखशीची भाजी, डिंकाचे लाडू व मेथीचा पुलाव. पौष्टीक,चवीला छान असणारे, झटपट होणारे हे पदार्थ कसे बनवतात ते आपण पाहूया.

१) खसखशीची भाजी:
साहित्य:       खसखस १०० ग्रॅम
                      कांदे २-३  बारीक चिरलेले
                      अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे
                      थोडी कोथिंबीर बारीक चिरून
                      २-३ ओल्या मिरच्या उभ्या चिरुन
                      फोडणीसाठी ते,हिंग,मोहरी,जिरे,हळद व मीठ

कृती:  खसखस थोड्या गरम पाण्यात भिजत घालावी. कमीत कमी २-३ तास तरी भिजवावी. नंतर सूप गाळायच्या मोठ्या चाळणीने पाण्यातून काढावी व मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटावी.

तेलावर हिंग मोहरी व जिरे घालून त्यावर मिरच्या व कांदा घालावा. त्यावर हळद मीठ(अंदाजे सर्व भाजीला लागेल एवढे) घालून मंद आचेवर कांदा थोडा शिजवून घ्यावा. त्यावर वाटलेली खसखस आणि थोडे पाणी घालून चांगले ढवळावे व त्यावर झाकण ठेवावे. झाकण काढून अधूनमधून ढवळत राहावे. शिजून भाजी चांगली मोकळी झाली की वर खवलेले ओले खोबरे व कोथिंबीर घालून भाजी पुन्हा ढवळावी....
अशा तर्‍हेने तयार झालेली भाजी खाण्यास अतिशय रूचकर लागते.

लेखिका: जयबाला परूळेकर                   
खसखशीची भाजी डिंकाचे लाडूमेथीचा पुलाव

२ टिप्पण्या:

अपर्णा म्हणाले...

एकदम हटके आहे रेसिपी....आणि अस वाटत की ही खाऊन झोप पण मस्त येईल...माझे तसेही पौष्टिक खायचे दिवस आहेत त्यामुळे येऊ देत सगळं पौष्टिक...

सुहास झेले म्हणाले...

सही एकदम..पहिल्यांदाच ऐकतोय. नक्की करून बघेन...