खारीक चुरा १०० ग्रॅम
बदाम जाडसर चुरा घरी करावा १००ग्रॅम
काजू तुकडे १०० ग्रॅम
जायफळ किसून(बारीक किसणी वापरावी)
पिस्ते १०-१२,तुकडे करून
सुके खोबरे १ वाटी किसून
गूळ ३०० ग्रॅम
कृती: डिंक मायक्रोवेव्हमध्ये फुलवून घ्यावा. मायक्रोवेव्ह नसल्यास कढईत थोड्या साजूक तुपात थोडा थोडा डिंक टाकून फुलवून घ्यावा. त्या डिंकाचा हाताने किंवा मिक्सरमध्ये चुरा करावा. त्याच कढईत किसलेले सुके खोबरे भाजून घ्यावे....फार लाल भाजू नये पण कुरकुरीत होईल इतपत भाजावे. त्यानंतर तेही कुसकरून घ्यावे. डिंक खोबरे,बदामचुरा,काजूचे तुकडे,पिस्त्याचे तुकडे,खारीक चुरा, किसलेलं जायफळ असे सगळे पदार्थ एका परातीत एकत्र करावे.
कढईत बारीक चिरलेला गूळ वितळवून (पाक करू नये) नंतर त्यात परातीमधले सर्व साहित्य घालावे व ढवळून घेऊन लगेच लाडू वळावे. लाडू छोटेच करावे, कारण तसे हे लाडू पचायला जडच असतात. गूळ नको असल्यास पिठीसाखर व थोडे तूप घालून लाडू करावे.
लेखिका: जयबाला परूळेकर
लेखिका: जयबाला परूळेकर
खसखशीची भाजी | डिंकाचे लाडू | मेथीचा पुलाव |
---|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा