ही कुठली दुनिया असली?

स्पंदनात घुमते मुरली
दरवळतो ऋतू एकांती
ना चौकट याला... कसली
ही कुठली दुनिया असली?

लडिवाळ दिशा बोलती
फुलपान सवे गुणगुणती
ही कसली भाषा... इथली?
ही कुठली दुनिया असली?

हा कसला अजब जिव्हाळा?
मन फुलते; पाणी डोळा
ही ओढ कशी... आगळी?
ही कुठली दुनिया असली?

कवयित्री: कामिनी फडणीस-केंभावी (श्यामली)

४ टिप्पण्या:

Vandana म्हणाले...

अरे वा! खुप छान, सुंदर.
वंदना केंभावी

Gangadhar Mute म्हणाले...

"ना चौकट याला... कसली
ही कुठली दुनिया असली?"

सुरेख कविता.

श्यामली म्हणाले...

आवर्जून इथे येऊन अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद वंदना :)
मुटेजी मन:पूर्वक धन्यवाद :)

Varsha म्हणाले...

अरे वा श्यामली! क्या बात है! मस्तच