काहीतरी हरवल्यासारखं वाटत....

कुठेतरी काहीतरी हरवल्यासारखं वाटत,
मन कासावीस होत,
कशाच्या तरी मागे धावत,
अडखळत धडपडत,थकतं आणि थांबतं ॥

कधी कधी वाटतं,
हरवलेलं सापडलं,
त्या गोष्टीला मन आंजारतं गोंजारतं,
पण नंतर कळतं,
जे हव होतं ते हे नव्हतंच; ॥
पुन्हा मन धावत पळत,
सापडलं असं वाटत,
अगदी हात लांबवून जवळ घ्यावं,
इतक ते जवळ आहे अस वाटतं,
पण इतक्यात ते पुन्हा दूर निघून जातं; ॥
मृगजळाच्या मागे धावतोय हे कळतं,
पण तरीही काहीतरी हरवल्यासारख वाटतं,
मग केव्हातरी हळूच मन मागे वळतं
अन् आयुष्यच हरवल्याचं नकळतच कळतं

कवयित्री: जीवनिका कोष्टी

३ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

जीवनिका, छान..मस्त जमलीय कविता

क्रांति म्हणाले...

सुंदर!

jivanika म्हणाले...

तुम्हा दोघांचे खूप खूप आभार!!!