साहित्य: मेथीदाणे १ छोटी वाटी
बासमती किंवा बारीक कोलम तांदूळ २ वाट्या(अंदाजे)
हळद,तिखट,मीठ,साखर,लिंबाचा रस,गरम मसाला पावडर,
तेल,हिंग,मोहरी,थोडे साजूक तूप,ओले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर,
३-४ कांदे बारीक चिरून
बासमती किंवा बारीक कोलम तांदूळ २ वाट्या(अंदाजे)
हळद,तिखट,मीठ,साखर,लिंबाचा रस,गरम मसाला पावडर,
तेल,हिंग,मोहरी,थोडे साजूक तूप,ओले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर,
३-४ कांदे बारीक चिरून
कृती: सकाळी मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवावे. रात्री ते पाण्यातून काढून २-३ वेळा धुवावे म्हणजे त्याचा बुळबुळीतपणा जातो.नंतर मेथी स्वच्छ फडक्यात बांधून ठेवावी. मोड यायला कधी कधी दोन दिवसही लागतात. अशी मोड आलेली मेथी वाटीने मोजून घ्यावी व त्याच्या दुप्पट तांदूळ घेऊन धुवून घ्यावेत.
तेलावर हिंग मोहोरी फोडणीस टाकून कांदा तेलावर परतून घ्यावा. कांदा जास्त असला की पुलाव चांगला लागतो. त्यावर मेथी व तांदूळ घालून हळद,तिखट,मीठ,गरम मसाला पावडर घालून छान शिजवावा. भात होत आला की त्यात थोडी साखर व लिंबाचा रस घालून ढवळावा . थोडे साजूक तूप घालून पुन्हा झाकण ठेवून वाफ आणावी .
सर्व्ह करतांना खोबरे व कोथिंबीर घालून सजवून वाढावा, डायबेटीस असणार्यांनी हा जरूर खावा.
लेखिका: जयबाला परूळेकर
खसखशीची भाजी | डिंकाचे लाडू | मेथीचा पुलाव |
---|
1 टिप्पणी:
खमंग एकदम..वाह :)
टिप्पणी पोस्ट करा