मेथीचा पुलाव

साहित्य:  मेथीदाणे १ छोटी वाटी
                 बासमती किंवा बारीक कोलम तांदूळ २ वाट्या(अंदाजे)
                 हळद,तिखट,मीठ,साखर,लिंबाचा रस,गरम मसाला पावडर,
                 तेल,हिंग,मोहरी,थोडे साजूक तूप,ओले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर,
                ३-४ कांदे बारीक चिरून

कृती:  सकाळी मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवावे. रात्री ते पाण्यातून काढून २-३ वेळा धुवावे म्हणजे           त्याचा बुळबुळीतपणा जातो.नंतर मेथी स्वच्छ फडक्यात  बांधून ठेवावी. मोड यायला कधी कधी दोन दिवसही लागतात. अशी मोड आलेली मेथी वाटीने मोजून घ्यावी व त्याच्या दुप्पट तांदूळ घेऊन धुवून घ्यावेत. 

तेलावर हिंग मोहोरी फोडणीस टाकून कांदा तेलावर परतून घ्यावा. कांदा जास्त असला की पुलाव चांगला लागतो. त्यावर मेथी व तांदूळ घालून हळद,तिखट,मीठ,गरम मसाला पावडर घालून छान शिजवावा. भात होत आला की त्यात थोडी साखर व लिंबाचा  रस  घालून ढवळावा  . थोडे साजूक तूप घालून पुन्हा झाकण ठेवून वाफ आणावी  . 

सर्व्ह करतांना खोबरे व कोथिंबीर घालून सजवून वाढावा, डायबेटीस असणार्‍यांनी हा जरूर खावा. 

लेखिका: जयबाला परूळेकर   

खसखशीची भाजी डिंकाचे लाडूमेथीचा पुलाव