माझा (वि)चित्रकलेचा प्रवास ! - भाग ४

हा सिलसिला इथेच थांबत नाही. २००९ मधील मार्चमध्ये आम्ही आठ ज्येष्ठ नागरिक  व संस्कार  भारतीचे सभासद एकत्र येऊन आमच्या चित्रांचा एक ग्रुप शो आयोजित केला होता व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्या वेळी मी काढलेली एक व्हिडियो क्लिप खाली देत आहे.  आता  २०११ मध्ये मी स्वत:चे चित्र प्रदर्शन भरवू इच्छीत आहे



आज इंटरनेटचा जमाना आलाय. प्रथम प्रथम कॉम्प्युटर माझी टर उडवायचा , ती ही भिती गेलीय, अगदीच एखादी गोष्ट कळलीच नाही तर कोणाही माहीतगाराला साद घातली तर हवे ते मिळते. मध्ये ऑर्कुट वर असताना २००९ साली रोज एक चित्र टाकण्याचा धुडगूस घातला होता. अनेक मित्रांनी त्या वेळी पाठ थोपटली होती. आता फेसबुकवर ही तोच सिलसिला चालू केला आहे. कसे जमत आहे हे तुम्ही रसिकांनी सांगायचे आहे. त्याचमुळे नवीन चित्रे येथे टाकलेली नाहीत ती आपणास ह्या दोन्ही साईट वर पाहू शकाल.












लेखक :- सुरेश पेठे



५ टिप्पण्या:

सुरेश पेठे म्हणाले...

थोडासा घोटाळा झालाच. मी जे अनुक्रमांक दिलेत ते माझ्या पिकासा च्या लिंक मधले आपण जी चित्रे
टाकलीत ती फेसबुक मधली.

http://picasaweb.google.com/sureshpethe/MajhaVChitrpravas#

Meenal Gadre. म्हणाले...

सर्वच चित्र सुंदर आहेत. वॉटर कलरने चित्र रंगवणे सर्वाधिक कठिण आहे.

Unknown म्हणाले...

सुरेशजी सगळेच अप्रतिम, फेटाउछाल (हॅट्स ऑफ)

प्रमोद देव म्हणाले...

पेठेसाहेब,आवश्यक ते बदल केले आहेत.

अनामित म्हणाले...

काका सगळीच चित्रे, पोस्ट मस्तच...
आणि नाशकातले तपशील आल्यामुळे पोस्ट आणि जिव्हाळ्याची वाटली :)
तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा!!