उस्ताद आमीरखॉ - भाग शेवटचा

या लग्नानंतर त्यांनी त्यांची शिष्या मुन्नीबेगम हिच्याशी लग्न केले. हे लग्न बराच काळ टिकले. खॉसाहेब हिला खलिफन म्हणून हाक मारायचे. मुन्निबेगम या स्वभावाने प्रेमळ असल्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांमधे लोकप्रिय होत्या. यांच्या पासून एक मुलगा झाला त्याचे नाव ईक्रम. हा इंजिनिअर झाला आणि कॅनडाला स्थाईक झाला. याच काळात खॉसाहेबांनी अजून एक लग्न केले ते ठुमरी गायिका मुश्तारीबेगमच्या मुलीशी. हिचे नाव होते रईसाबेगम. .हे सहन न होऊन मुन्नीबाईंनी घर सोडले आणि त्या परत कधीच दिसल्या नाहीत. रईसाबेगमपासून त्यांना एक  मुलगा झाला. त्याचे नाव आहे शाहबाज़खान. याला टिपू सुलतान या सिरीयलमधे तुम्ही हैदरलीच्या भूमिकेत कदाचित पाहिलेही असेल. दुर्दैवाने संगीताची त्यांची गादी त्यांच्या घराण्यात पुढे कोणीही चालवली नाही. धाकटे भाऊ मात्र इंदोर रेडिओ स्टेशनवर सांरगी वाजवायचे आणि तेथूनच निवृत्त झाले.


फेब्रूवारी १३, १९७४ रोजी अमीरखॉसाहेब कलकत्यात आपल्या मित्राकडे जेवून परत निघाले असता त्यांच्या मोटारीला समोरून दुसर्‍या एका मोटारीने जोरदार धडक मारली. ती एवढी भयंकर होती की दोन्ही मोटारींनी दोन पलट्या मारल्या. खॉंसाहेब दरवाजात बसले होते. ते दरवाजा तुटून बाहेर फेकले गेले आणि बाहेर फूट्पाथवर असलेल्या खांबावर आदळले. तेथेच जागेवर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

संध्याकाळच्या मारव्याची अखेर ही अशी झाली....




लेखक : जयंत कुलकर्णी.
9823230394 9823230394
 
jayantckulkarni@gmail.com

ऋणनिर्देश : श्री. चांदवणकर यांचा लेख,
श्रीमती सुशीला मिश्रा यांचा लेख.
श्री. अमजदअली खान व श्री जोशी यांनी सांगितलेल्या आठवणी.
सर्व छायाचित्रे महाजालावरून साभार.







५ टिप्पण्या:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis म्हणाले...

लेख सुंदर व माहितीपूर्ण झाला आहे. अमीरखां हे माझे आवडते गायक.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

व्व्वा! मस्त रंगली मैफल. मेरुखंड गायकीची वैशिष्ट्ये प्रथमच समजलीं. अमजाद अलींची आठवण हृद्य आहे.

मोगले आझम मधील तानसेनचा आवाज चित्रपटभर मनांत रेंगाळतो तसेच आज दिवसभर होणार.

गायकीची वैशिष्ट्ये, चिंतन आणि आठवणी यांचा समतोल उत्कृष्ट साधला आहे.

अप्रतिम अभ्यासपूर्ण, शिस्तबद्ध, टापटिपीच्या पण मनोरंजक लेखाबद्दल धन्यवाद.

सुधीर कांदळकर

Suhas Diwakar Zele म्हणाले...

वाह जयंतकाका..क्या बात है. अतिशय माहितीपूर्ण आणि मुद्देसुत पोस्ट.
खूप आवडली !!!

Gangadhar Mute म्हणाले...

फ़ारच सुंदर माहितीपुर्ण.

क्रांति म्हणाले...

अतिशय उत्तम लेख!