पहिले एक दोन दिवस तर गटागटाने ये जा करत असल्याने टॅक्सी करून आलो. पण मग बसने जाणे होते. त्यामुळे एक दिवस निघण्याआधी कोणती बस, वेळ वगैरे विचारून संध्याकाळी निघालो . आम्हाला वाटले आता बस येईल, आता येईल. पण आमची वेळ चुकली होती. आम्ही बस गेल्याच्या पाच मिनिटानंतर बस थांब्यावर पोहोचलो होतो. त्या थंडगार हवेत हाल होत आहेत असे वाटले. शेवटी अर्धा पाऊण तास वाट पाहून आम्ही विचार केला की टॅक्सी ने जाऊ. तेवढ्यात बस आली. मिल्वॉकीला मी १३ दिवस असेन पण फक्त दोनच दिवस बिना-बर्फाचे गेले. इतर दिवस तर बर्फच बर्फ चोहीकडे. शनिवारी सकाळी परत निघायचे विमान पकडायचे होते. म्हणून रात्री सामान भरत होतो. रात्री पुन्हा जोरदार हिमवर्षाव चालू झाला. सकाळपर्यंत भरपूर बर्फ जमा झाला होता. इतर दिवस काही वाटले नव्हते एवढा बर्फ पडत होता तरी. पण आता वाटले की असाच बर्फ पडत राहिला तर परत जाण्याची अडचण. रस्ते बंद झाले तर काय. पण सकाळी बर्फ हटविणारी गाडी आली. तिने गाड्यांचा रस्ता मोकळा करून ठेवला. हुश्श.
हे सर्व झाले माझे अनुभव. पण जे ऐकून आहे त्याप्रमाणे तर बहुतेक शहरांत तापमानाचा फरक खूपच असतो. नागपूर, दिल्ली येथील थंडीतील ५ अंश तापमान ते उन्हाळ्यात ४०/४५ अंशापर्यंत तापमान जाते. म्हणजे त्या शहराच्या तापमानात ३५/४० अंशांचा फरक पडतो. ह्याउलट मुंबई मध्ये १८ ते ३८ म्हणजे २० चा. पण माझ्या माहितीतले नुकतेच ऐकलेले म्हणजे सायबेरिया देशात तापमान हिवाळ्यात -३८ पर्यंत जाते तर उन्हाळ्यात +४० पर्यंत जाते म्हणजे तापमानाचा फरक ७८ अंशाचा?
आपल्या सवयीप्रमाणे २० अंशांचा फरक परवडला. त्याचीच मजा घेत राहू :)
लेखक: देवदत्त गाणार
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
---|
२ टिप्पण्या:
वाचूनच हुडहूडी भरली. तरी तुम्हीं गाणार? बोलूनचालून देवदत्त तुम्हीं. ;)
वा! आवडला लेख.
सुधीर कांदळकर
सायबेरियापेक्षा मुंबई बरी :)
मस्तच अनुभव
टिप्पणी पोस्ट करा