हा टाईम्स ऑफ इंडियात होता. त्याला शिफ्टमध्यें काम करावें लागे. योगायोगानें मीं आजोळीं गेलों कीं हा घरीं नाना नसले तर चौकोनी टेबलाशीं बसलेला दिसे. हिंदी गाणीं याला फार आवडत. नाना असले तर माजघराच्या सज्जांत खुर्ची टाकून. इथून रस्त्यावरचें सर्व दिसे. एकदां मीं कांहींतरी कामासाठीं खालीं मामीला भेटून वर मावशीकडे न येतां तसाच खालच्या खालीं निघून गेलों होतों. मग मावशीला इतकें वाईट वाटलें होतें. तो तिचा दुःखी चेहरा पाहिल्यावर मीं तो प्रमाद पुन्हां केला नाहीं. बाळादादा रफीचा जबरदस्त पंखा. लहानपणींच्या माझ्या पहिल्या आठवणींतला बाळादादा चौकोनी टेबलाशीं दरवाजाकडे तोंड केलेल्या खुर्चीवर बसला होता. रेडिओवर मुकेशचे ‘मैं तो इस रात की तनहाई, आवाज ना दो’ हें गाणें चालू होतें. भावुक होऊन तो तन्मयतेनें ऐकत होता. डोळे उघडे होते पण मन वेगळ्याच विश्वांत. गाणें संपल्यावरच त्याला मीं दिसलों. याला पत्नीहि तश्शीच सुस्वरूप व सुस्वभावी मिळाली. आदर्श पतिपत्नी म्हणाल तर बाळादादावहिनी किंवा मामामामी. आज हा पासष्टीचा आहे पण पस्तिशीचा दिसतो. याचें खरें नांव धनंजय. अजूनहि हा कांहीं छान बोलला आणि आपण दाद दिली कीं काय डायलॉग मारला तर म्हणतो धनंजयाचा बाण आहे बाबा! येरागबाळ्याचा नाहीं.
मावशी आईपेक्षां वयानें बरीच मोठी. मावशीची सर्वांत मोठी मुलगी आमच्या आईपेक्षां केवळ चार वर्षानें लहान. म्हणजे बघा किती अंतर असेल मावशीच्या आणि आईच्या वयांत. मावशी अंगापिंडानें मामासारख्या पैलवानाची बहीण शोभेल अशीच. नऊवारी पातळ, लालसर फ्रेमचा बायफोकल चष्मा. स्वभाव अतिशय प्रेमळ. हिला एक अपवाद वगळता रागावलेलें मीं कधीं पाहिलें नाहीं. एकदां मात्र रागानें तिनें जवळजवळ माझ्या मुस्काटांतच मारली होती. तिनें मला कांहींतरी खाऊ दिल्यावर मी म्हणालो होतों, ‘माय मरो आणि मावशी जगो’.
मावशीच्या यजमानांना सगळे नाना म्हणत. जवळजवळ गोरापान वर्ण, साडेपांच फूट उंच, पांढरेंफेक पायघोळ धोतर, तस्साच पांढराफेक सदरा आणि तश्शीच पांढरीफेक गांधीटोपी. जाकीट चढवल्यावर तर मंत्रालयात सहाव्या मजल्यावर शोभेलसे पण लोभस व्यक्तिमत्त्व. यांचा देखील लालसर फ्रेमचा चष्मा. स्पष्ट शब्दोच्चार, सौजन्यशील स्वर आणि मृदु बोलणें. पाहतांक्षणींच छाप पाडणारें व्यक्तिमत्त्व. मला आठवतात तेव्हांपासून ते शासकीय मुद्रणालयातून निवृत्त झालेले. वयाचा अंदाज करणें कठीण. होते त्यापेक्षां दहापंधरा वर्षांनीं तरूणच दिसत. सहकारी बॅंकेचे संचालक होते. रोज बॅंकेत जाऊन बसत. खातेदारांना मार्गदर्शन करीत. मला आठवतें मीं नोकरीला लागलो तेव्हां त्यांना पेढे द्यायला गेलों होतों, तेव्हां त्यांनीं सांगितलें कीं आतां बॅंकेत बचत खातें उघड.

१ | २ | ३ | ४ |
---|
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.