अर्ध्या तासाने आम्ही पुन्हा त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या मधोमध एक जाड दोर टाकलेला होता. त्याला पकडून आम्ही चालू लागलो. पाणी खांद्यापर्यंत होतं. बॅग आणि छत्री डोक्यावर धरून आम्ही चालत होतो. त्या पाण्यामध्ये मेलेले उंदीर, घाण अक्षरश: एक फुटावरून जात होती. कुर्ल्याच्या मार्केटमध्ये तर भाजीपाला वर तरंगत होता. काही तरुण मंडळी एका मोडक्या बाथटबमध्ये म्हाता-या माणसांना नेत होती. अनेक ठिकाणी पाण्यात बुडलेल्या टॅक्सी आणि त्यावर त्या पावसात सापडलेली, जगाचा निरोप घेतलेली माणसे. अर्धा तास आम्ही अश्या पाण्यात चालत होतो. कुर्ला मार्केट पार केलं आणि शीतल टॉकीज लागलं तेव्हा कुठे जाऊन पाण्याचा स्तर खाली आला. जड झालेलं, भिजलेलं अंग घेऊन आम्ही लाल बहाद्दुर शास्त्री मार्गावर पोहचलो. तिथून अर्ध्या तासात घाटकोपर स्टेशन आलं. भुषणला भटवाडीच्या रस्त्याला आम्ही निरोप दिला. सीमाला मराठी विद्यालयच्या रस्त्याला सोडून मी आतेभावाच्या घरचा रस्ता गाठला.
मी अनुभवलेली अशी ही काळ रात्र होती २६ जुलै २००५.
लेखक: आनंद काळे
मी अनुभवलेली अशी ही काळ रात्र होती २६ जुलै २००५.
लेखक: आनंद काळे
१ | २ | ३ | ४ |
---|
७ टिप्पण्या:
आका, खरच खूप भयंकर परिस्थिती होती रे त्यावेळीस.. :(
छान प्रयत्न मित्रा..लिहते रहा :)
छान. माझ्याही आठवणी जाग्या झाल्या.
भयानक दिवस होता तो.
भयानक... दारूण... वर्णनाने पुन्हा ते दिवस आठवले.. मी अडकलो नव्हतो पण शमिका अंधेरीला फसली होती.. आणि दादा फोर्ट ला.. २ दिवसांनी घरी पोचला.. :( दोघे सुखरूप पोचले हेच खूप...
आका....भयानक अनुभव आहे...
आम्हा दोघांना ही चिंता की ही व्यवस्थित पोहचली नाही तर तिचा पोलिसबाप आपल्याला काही सोडणार नाही...:)
मी पण तेव्हा कांदिवलीत अडकले होते...ब्लॉगवर एका सव्वीस च्या आठवणीत लिहलय...हा दिवस कम रात्र विसरणं अशक्य...लिहिते राहो भिडू..
Aapalya pratikriyanbaddal dhanyavaad...
Pahilach prayatn hota likhaaNaacha.. aapalya abhiprayabaddal aabhaar..
टिप्पणी पोस्ट करा