'घननीळा लडिवाळा ...' हे गाणे 'उमज पडेल तर' या चित्रपटातील आहे. गदिमांचे काव्य, बाबूजींचे संगीत व माणिक वर्मांचा सूर असा त्रिवेणीसंगम यात साधला आहे. चित्रफीत पाहताना जाणवेल कीं शुभा खोटेने गाणे म्हणण्याचा अभिनय अप्रतिम केला आहे, जणू तिनेच गाणे म्हटले असावे असे वाटते. तबल्याची साथ उस्ताद अहमदजान थिरकवा यांची आहे व पेटीला (बहुधा) तुळशीदास बोरकर आहेत. हा आणखी एक त्रिवेणीसंगम!
१ | २ |
---|
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.