एक क्षण असा...
मौनालाही बोलते करणारा,
नि:शब्द शांततेला...
अलवार स्पर्श हा तुझा, प्रिया तुझाच सैलसा...,
फुलतो कसा शहारा..., अंगावरी अन गोडसा...! प्रिया तुझाच सैलसा..... १
एक क्षण असा...
अव्यक्तातून व्यक्त होणारा,
मुग्ध भावनांना...
हलकेच गोंजारणारा....!
धुंदावल्या कळ्यांना, अन छेडतो तो मारवा,
अशी तुझ्यासवेच मी, अन धुंद त्या चांदण्या..! प्रिया तुझाच सैलसा..... २
एक क्षण असाही...
शब्दांनाही नि:शब्द करणारा,
अबोल लाजर्या फुलांना...
हजार जिभा देणारा...!
कळल्या मुक्या फ़ुलांना, अन भावना मनीच्या...,
सामावले तुझ्यात मी..., मनमोर तृप्त जाहला...! प्रिया तुझाच सैलसा... ३
तो क्षण, कसा बेभानसा...
सर्वस्व विसरवणारा..
तुझ्यासवे रमताना
तुझ्यातच विरघळणारा...!
३ टिप्पण्या:
एक क्षण असाही...
शब्दांनाही नि:शब्द करणारा,
अबोल लाजर्या फुलांना...
हजार जिभा देणारा...!
मस्तच विशालदा.. :)
classic one!!!
सुरेख कविता.
टिप्पणी पोस्ट करा