माझीया अंगणी, रोज आता, ओसंडतो पारिजात
भारून वारा , गंधून सारा , येतो घरात
भुईने माळली, चांदणफूले , जणू देहात
धूंदल्या दिशा , परिमळे कशा , अवघ्या जगात
रातराणी ती, कोपरा एक , व्यापून जात
जाई-जुई , कल्पवृक्ष माझ्या, छोट्या जागेत
सोनचाफा तो, देखणा एक , उभा दारात
प्रसन्न मोगरा , फुलांनी भरला , तो ताटव्यात
चिमणे पक्षी, चिवचीव किती , रोज येतात
फुलपाखरे ती , रंगाची उधळण , माझ्या बागेत
तुळशी पवित्र , दिवा तेवत , वृंदावनात
आंब्याचे झाड , मांगल्य तोरण , त्याच्या छायेत
पाऊस बघे, थांबून वरती , त्या अंबरात
टपोर्या थेंबात, सिंचत जीवन , ये आवेगात
ऋतूही येती, नाचत सर्व , गाणे गात
सूर्य-चंद्र , आणिक तारे , ते अचंब्यात
बहर मनाला, नव्याने आलेला, जसा प्रेमात
प्रियेने दिलेले , चोरटे चुंबन , केवळ लक्षात
सुखद लाटा, मंद मंद , आयुष्या येत
आशेला लाभले, गरूडाचे पंख, झेप जोशात
कवी: समीर नाईक
४ टिप्पण्या:
मस्त कविता.
वाह छान...
गंगाधरजी ! अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद !
सुहासजी ! प्रतिसादासाठी मनापासून आभार !:)
टिप्पणी पोस्ट करा