मन!

मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं!
जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं..

मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास!
जशी कोकीळाची साद अन्‌ नुसताच त्रास!!

मन उगाच निस्तब्ध..काळजाचा थरकाप..
जसा स्तब्ध पाण्यावर, उठे तरंग..अश्राप!

मन उगाच तत्वज्ञ, करी अनंत विचार..
जशी अळवाच्या पानी मोतियाची थरथर!

मन उगाच अल्लड..दोन अश्रुंची झिम्मड!
जशी पावसाची सर..अलगद..अलवार..

मनं जुळून येतात..हातांमधे दोन हात..
जशी रात्र दिवसाची उलगडते पहाट!!

कवी:राहुल पाटणकर (राघव)

४ टिप्पण्या:

Meenal Gadre. म्हणाले...

`मन उगाच अल्लड..दोन अश्रुंची झिम्मड!
जशी पावसाची सर..अलगद..अलवार..`

हे मस्त आहे.

Gangadhar Mute म्हणाले...

सुंदर कविता.

Kamini Phadnis Kembhavi म्हणाले...

सुंदर कविता...

Suhas Diwakar Zele म्हणाले...

मनं जुळून येतात..हातांमधे दोन हात..
जशी रात्र दिवसाची उलगडते पहाट!!

मस्तच :)