आर्त विनवणी करू गुरूदत्ताची
ब्रम्हा विष्णू महेशाची
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||ध्रू||
ब्रह्मदेव सृष्टी रचितो
श्रीविष्णू पालन करितो
महेश संहार करी, पुनर्निर्मितीसाठी
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||१||
शंख चक्र कमंडलू धरीले हाती
खांद्यावरी झोळी, भस्म असे माथी
देवा दत्ता भिक्षा घ्या गरीबाघरची
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||२||
जटाजूट घन केशसंभार
रुद्राक्षमाळा गळाभरोनी
गोश्वानासह त्रैमुर्ती अवतरली
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||३||
कवी: सचिन बोरसे उर्फ पाषाणभेद (दगडफोड्या)
दत्तगुरुंचे छायाचित्र महाजालावरून साभार!
५ टिप्पण्या:
आजच्या दत्तजयंती निमित्ते भक्तांना खास आरतीची मेजवानी.
दत्तगुरुंच्या चित्राला छायाचित्र म्हण्णे म्हंजे रंगचित्राला भासचित्र म्हणण्यासारखेच काहीसे...
आरती म्हणून पाहिली. छान जमली आहे.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
जय जय गुरुदेव दत्त! भक्तिरसानं ओथंबलेली आरती आवडली.
टिप्पणी पोस्ट करा