इनटॉलरेबल क्रुएल्टी - भाग ४

हाईंझ द बॅरन क्राउस वॉन एस्पी - मॅस्सीचा सहकारी वकिल व्रिग्ली   

जगी गुप्तहेर गस पेच - मॅरिलिनचा वकील फ्रेडी बेंडर - हॉवर्ड डॉयल
चित्रपटातल्या बड्या कलाकारांनी त्यांच्या नावाला साजेसा तगडा अभिनय तर केलाच आहे, पण यातले छोट्यातली छोटी भूमिका करणारे कलाकारही तितकेच लक्षात राहतात. अगदी तोळामासा प्रकृतीचा कधीही दम्याचा झटका येऊन कोसळेल असं वाटणारा पण चक्क पेशाने कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणजेच सुपारी घेऊन खून करण्याची कामे करणारा गुंड व्हीझी जो (अर्विन केय्स), काहीही चांगली घटना घडली की भावनावश होऊन लगेच रडू कोसळणारा मॅस्सीचा सहकारी व्रिग्ली (पॉल अ‍ॅडल्स्टीन), सगळा सिनेमाभर चेहर्‍यावर बारा वाजल्यासारखे पराभूत भाव घेऊन वावरणारा मॅरिलिनचा वकील फ्रेडी बेन्डर (रिचर्ड जेन्किन्स), 'I'm gonna nail your arse' हे घोषवाक्य असल्याच्या थाटात सतत बोलून दाखवणारा खाजगी गुप्तहेर गस पेच (सेड्रिक द एंटरटेनर), मॅरिलिनच्या विरोधात कोर्टात साक्ष देणारा आणि अत्यंत भयानक फ्रेंच उच्चारात बोलणारा हाईन्झ द बॅरन क्राउस वॉन एस्पी (जॉनाथन हॅडरी), आणि मॅरिलिनचा अखंड बडबड करणारा दुसरा नवरा हॉवर्ड डॉयल (बिली बॉब थ्रॉन्टन) यांचीही कामे झकास झाली आहेत.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.