लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा। ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार॥ या ओळी शाळेतील निबंधात सर्रास वापरण्याची सवय होती. त्यावेळी असंच वाटायचं की मोठ्यांचं आयुष्य किती छान. अभ्यास करायला नको आणि आपल्याला हवं ते करायचं. कोणी टोकत नाही. पण तेच लहानपण एकदा सरून गेल्यावर त्याची किंमत कळली. लहानपणच्या त्या छान आठवणी मनाच्या आत खूप खोल तळाशी जाऊन बसलेल्या असतात. आजूबाजूला लहान मुलं बागडताना दिसली, त्यांची गमतीशीर बोलणी ऐकली की त्या आठवणी मनाच्या तळातली आपली जागा सोडून मधूनच डोकं वर काढतात. ऐन मे महिन्यातील उन्हाच्या काहिलीत एखादी वळवाची सर जसा थंडाईचा शिडकावा आजूबाजूच्या वातावरणावर करून जाते अगदी तसंच छान वातावरण या आठवणी तयार करतात. अशाच काही आठवणी आज सगळ्यांबरोबर वाटून घेणार आहे.
लहानपणी (म्हणजे वयाच्या पाच वर्षांपर्यंत) घरातले सगळे तसेच शेजारपाजारचे मला वेगवेगळ्या नावांनी हाक मारायचे. इतकं छान वाटायचं प्रत्येकाकडून वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाणं. मी दीड-दोन वर्षांची असताना माझ्या बहिणींचा आवडता कार्यक्रम असायचा मला कोण कोण कोणत्या नावाने हाक मारतं ते विचारायचा. आणि मी सुद्धा अगदी प्रत्येक नाव व्यवस्थित सांगायचे. लहान असताना पायात घालायला ते वाजणारे बूट आणलेले होते. ते बूट घालून मी मस्त बदकासारखी सगळीकडे फिरत राहायची. म्हणून बाबा मला बदक म्हणायचे. सारखा आईचा पदर धरून सगळीकडे तिच्या मागोमाग फिरत असल्याने आई मला वासरू म्हणायची. मधल्या दोघी बहिणी शोंड्या-पांड्या म्हणायच्या तर मोठी बहीण मनीमाऊ आणि शेजारी राहणार्या काकू मला ठकी म्हणायच्या. मोठ्या बहिणीच्या सगळ्या मैत्रिणींच्या वाढदिवसाला तिच्याबरोबर मला खास आमंत्रण असायचे. मी तिथे नक्की काय करायचे ते आठवत नाही पण सगळ्यांना मी तिथे हवी असायची. आम्ही त्यावेळी सोलापूरला राहत असू. एकदा आई मला आम्ही राहायचो त्या इमारतीच्या अंगणात फिरवत होती. बहुतेक अडीच वर्षांची असेन. समोरच रस्ता ओलांडल्यावर थोडं पुढे गेलं की कोपर्यावर पोस्टाची पत्रं टाकायची पेटी होती. आईने मला एक पोस्टकार्ड दिलं आणि जाऊन त्या पेटीत टाकायला सांगितलं. तशी लहानपणी मी प्रचंड धीट होते. आई इमारतीच्या फाटकात उभी राहून माझ्याकडे पाहत होतीच. मी ते वाजणारे बूट घालून बदकासारखी चालत पोस्टाच्या पेटीकडे निघाले होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक सायकलस्वार चालला होता. माझं पिटुकलं पिक पिक करत चालणारं रुपडं बघितलं आणि त्याला मजा वाटली. म्हणून आवर्जून सायकलवरून खाली उतरून त्याने माझा गालगुच्चा घेतला. तर मी त्याला काय उत्तर द्यावं? अतिशय टेचात मी त्याच्याकडे वर बघत म्हणाले होते "ए मुलीच्या अंगाला हात लावायला लाज नाही वाटत?"....माझं वय अडीच. त्या माणसाचा चेहरा एकदम कसनुसा, अगदी कोणीतरी श्रीमुखात भडकावल्यासारखा झाला होता असं आईचं निरीक्षण. असो.

१ | २ |
---|
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.