उडवितो दूधदही, करी तस्करी,
यशोदे असा गं कसा? तुझा श्रीहरी,
मेळवुनी लष्कर सेना, चोरी चोरी येतो,
लोणियाच्या सार्या हंड्या, चोरुनिया नेतो,
भरवितो गोप सारी, सखा सावरी...... ॥१॥
मारीयेला चेंडू हाता, यमुनेशी जाता,
लपवितो साडी चोळी, गोपिकांची न्हाता,
कान्हाईची खोड न्यारी, राधा बावरी ..... ॥२॥
मुरलीचा सूर सारा, नादब्रह्म बोले,
हरे कृष्ण, हरे कृष्ण, तन मन डोले,
हरे कृष्ण, हरे कृष्ण, तन मन डोले,
अरविंद साथसंग, नाचे मुरारी ....... ॥३॥
२ टिप्पण्या:
मुरलीचा सूर सारा, नादब्रह्म बोले,
हरे कृष्ण, हरे कृष्ण, तन मन डोले,
मस्तय गवळण
टिप्पणी पोस्ट करा