वाटबघ्याचे दिवास्वप्न !

दोन जीव भेटणं.एकमेकांत गुंतणं.एवढं झाल्यावर सुरू होतो सिलसिला गाठीभेटींचा.दोघं चोरून भेटत असतील तर भेटण्याची ठिकाणं गुलदस्त्यात ठेवायची असतात.ती सतत बदलती ठेवायची असतात.आपण सगळेच जण यातून जात असतो.दोघांतला कुणीतरी एक (बहुतेक वेळा मुलगी-स्त्री) दुसर्‍याला वाट बघायला लावत असतो.वाट बघणं ही कधीकधी शिक्षा होतेय की काय असं त्या दोघांमधल्या नको तेवढ्या वक्तशीर जीवाला (बहुदा पुरूषाला-मुलाला) वाटत असतं.त्यानं न चिडता, भांडता हे दिवास्वप्नं जरूर बघावं. आयुष्यातल्या गोष्टी मजेत घ्यावा लागतात.विनोदी अंगाने घ्याव्या लागतात.तर त्या सोप्या होतात कशा ते ऐका ह्या कवितेत...ह्या दिवास्वप्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्की सांगा!

                                                     लेखक आणि अभिवाचक : विनायक पंडित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: