इनटॉलरेबल क्रुएल्टी - भाग ६ (शेवटचा)

मॅरिलिन रेक्सरॉथ: What are you after Miles?
माईल्स मॅस्सी: Well, I'm a lot like you. Just looking for an ass to mount.
मॅरिलिन रेक्सरॉथ:Well, don't look at mine.

* *
माईल्स मॅस्सी: And to whom did you introduce that calculating woman?
हाईन्झ द बॅरॉन क्राउस वॉन एस्पी: I introduced her... [रेक्स रेक्सरॉथकडे अंगुलीनिर्देश करुन] to that silly man.
फ्रेडी बेंडर: Your Honor, objection!
माईल्स मॅस्सी: Let the record show that the Baron has identified Rex Rexroth as the silly man!

* *
फ्रेडी बेंडर: Objection, Your Honor: strangling the witness.
न्यायाधीश: I'm going to allow it.

* *
माईल्स मॅस्सी: How many cases has Herb Myerson won?
व्रिगली: The old man? More than anybody. He's a legend. And look at him. He's 86 years old,
he's the first one into the office in the morning.
माईल्स मॅस्सी: No home life.
व्रिगली: Who needs a home when you have a colostomy bag?

* *
चित्रपटातली एक बाब मात्र खटकते. 'इनटॉलरेबल क्रुएल्टी'ची श्रेयनामावली तिच्या क्युपिडछाप थीममुळे चित्रपटात शेवटी काय घडणार आहे ते अप्रत्यक्षरित्या सुरवातीलाच सुचवून जाते. तेवढं सोडलं तर हा सिनेमा तुमचे पैसे आणि वेळ, दोन्ही वसूल करुन देतो. चित्रपट हटके आहे, सात मजली हास्य वसूल करणारा आहे, आणि 'एकदा तरी बघावा' असा तर नक्कीच आहे (मी तीनदा पाहिलाय. एच.बी.ओ. वर एकदा खूप आधी पाहिला होता. पण हा लेख लिहीण्यासाठी चक्क डी.व्ही.डी. विकत घेतली आणि दोनदा बघितला). तुम्हीही अवश्य बघा. आणि हो, बघितला असेल तर तुमचं मत इथे जरूर सांगा.

पुढच्या लेखापर्यंत, नांदा सौख्यभरे!!!

लेखक : मंदार जोशी

ह्या लेखातील सर्व छायाचित्रे महाजालावरून साभार

३ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

जोशीजी तुम्ही चित्रपट समीक्षक आहात काय? फार छान निरीक्षण व शब्दांचे वापर जाणवले. छायाचित्रांना मात्र चौकटीत घुसवताना घाण झाली आहेत. आजकाल चौकटीत घुसवणे हा प्रकार असाच असावा असा नियम आहे की काय अशी शंका येते.

मंदार जोशी म्हणाले...

नाही, मी समीक्षक नाही, चित्रपटप्रेमी मात्र आहे. त्याच भावनेतून लिहीत असतो. म्हणुनच या सदराचं नाव चित्रपट परिक्षण असे न ठेवता चित्रपट 'परिचय' असे ठेवले आहे. छायाचित्रे डिव्हीडीवरुन सिनेमा बघताना स्क्रीनशॉट घेऊन टाकलेली आहेत म्हणून तसे वाटत असेल.

आणि हो रानडेकाका, अहो मी लहान आहे 'जी' वगैरे लाऊ नका नावापुढे :) नुसतं नावाने संबोधा मला :)

Suhas Diwakar Zele म्हणाले...

वाह मंदार..अप्रतिम परिचय करून दिलास. आज टाकतो डाउनलोडला :)